गोदावरी नदीतील तळ्यात १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Ahmednagar, Kopargaon: अंघोळीसाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना.
कोपरगाव: तालुक्यातील संवत्सर येथे गोदावरी नदीत समृद्धी महामार्गाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेला मनिष किशोर चव्हाण (वय 14) वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटना शुक्रवार (दि. 11) रोजी घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मनीष चव्हाण हा संवत्सर बिरोबा चौक येथील रहिवासी असून तो संवत्सर येथील जनता विद्यालयात इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होता. मनीष हा आपल्या आजोबां सोबत एकटाच राहत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मनिष चव्हाण हा आपल्या भावासोबत गोदावरी नदीतील तळ्यात आंघोळीसाठी गेला होता. यावेळी मनिष एकटाच पाण्यात आंघोळ करत असताना तो अचानक पाण्यात बुडाला.
हि घटना त्याच्या सोबत असलेल्या भावाने घरी येऊन सांगितली असता घरातील नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा पाण्यात शोध घेतला, दुपारी 3 वाजता मनिष याचा मृतदेह मिळून आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: 14-year-old boy drowned in Godavari river pond
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App