अहिल्यानगर: 11 वर्षीय बालिकेवर तरूणाकडून अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर.
अहिल्यानगर: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित मुलगी नातेवाईकांकडे येथील एमआयडीसी परिसरात आली असता ती गर्भवती असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला. या प्रकरणी तिच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षित कल्लु प्रजापती (रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेने (वय 23) दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मामाची पीडित मुलगी (वय 11) ही तिच्या गावातील शेतामध्ये शौचासाठी गेली असता, संशयित आरोपी परीक्षित कल्लु प्रजापती याने तिच्यावर जबरदस्ती केली. बळजबरीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदरची घटना 25 जुलै 2025 च्या पूर्वी सुमारे दोन महिन्यापूर्वी बांदा (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील एका गावात घडली असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, पीडित मुलगी एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या फिर्यादीकडे आली असता सदरचा प्रकार तिने फिर्यादीला सांगितला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (27 जुलै) रात्री संशयित आरोपी परीक्षित कल्लु प्रजापती विरोधात अत्याचार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना उत्तर प्रदेशात घडली असल्याने सदरचा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडे तपासकामी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
Breaking News: 11-year-old girl raped by youth