Rape | दहावीतील मुलगी गरोदर, नंतर कळले शिक्षकानेच बलात्कार केला
उस्मानाबाद: उस्मानाबाद येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक अमित माळी विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत मुलगी ही दहावी इयत्तेतील आहे. तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
नराधम शिक्षकाने केलेल्या या कृत्यामुळे कळंब मध्ये संताप व्यक्त केला जातोय, तसंच विद्यार्थीनींच्या पालकामध्ये भीती पसरली आहे. व्हॉट्सअप द्वारे चॅटिंग करून कळंब येथील फिर्यादीच्या आत्याच्या घरी इतर कोणी नसताना इच्छेविरुद्ध या शिक्षकाने संबंध ठेवले आणि बलात्कार केला.
दहावीत शिक्षणाऱ्या या विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार (Rape) केला. गेले अनेक दिवस हा नराधम शिक्षक मुलीचा लैगिक छळ करत होता, असा आरोप करण्यात आलाय. ही मुलगी एके दिवशी स्कुटीवरुन प्रवास करत होती. त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरु झाले. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेल तिथे या मुलीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय हादरले आहे.
Web Title: 10th grader got pregnant and later found out that the teacher had rape