धक्कादायक! 10 वीच्या मुलीवर घरात घुसून अत्याचार, पत्र्याच्या शेडमध्ये गर्भपात
Beed Crime: दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच दारूड्या तरुणाने अत्याचार (Rape) केल्याची घटना.
बीड: बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच दारूड्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली. आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर गाठले. त्यानंतर शहराजवळीलच एका डोंगरात नेऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमक्या देत गावातून बाहेर काढले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील तरुणाने दिव्यांग कुटुंबातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देत सतत अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली. पोटात दुखू लागल्याने आई-वडिलांनी सोनोग्राफी केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली. पीडिता 7 महिन्याची गर्भवती होती. विश्वासात घेऊन सर्व काही विचारलं असता. त्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यावेळी वडिलांनी आरोपीला फोन केला असता धमकी देऊन आई-वडिल आणि मुलीला घेऊन संभाजीनगर येथे रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये आणले. येथे मुलीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारू अशी धमकी देऊन आई-वडिलांना पुण्याला पाठवून दिले. पीडितेच्या चुलत भावाने तक्रार केल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह गर्भपात करणारे व मदत करणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानुसार तपासाची कारवाई सुरू आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
Web Title: 10th grade girl Rape inside house, aborted in paper shed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App