Home अकोले अकोले: हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून १०० जणांना विषबाधा

अकोले: हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून १०० जणांना विषबाधा

Breaking News | Akole: हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या १०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर, कोहणे, समशेरपूर, खिरविरे रुग्णालयांत हलविण्यात आले.

poisoned by food

अकोले: अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पुरक आहारातून तीन विद्याथींनींना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तालुक्यातील मवेशी येथील (करवंददरा) येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या १०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर, कोहणे, समशेरपूर, खिरविरे रुग्णालयांत हलविण्यात आले असून यात सात छोट्या बालकांचा समावेश आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अति गंभीर रुग्णांना तातडीने नाशिक, संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.

राजुर पासून १५ कि. मी अंतरावर असलेल्या मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात दि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी हळदीच्या कार्यक्रमात  जेवण केले, मात्र त्याच दिवशी संध्याकाळी व काल सकाळी जेवण केलेल्या लोकांना त्रास जाणवू लागला. यामुळे लागलीच या सर्वांना राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले आहे. काहीना नाशिक येथे हलविण्यात आले. २६ रूग्ण राजूर रुग्णालयात तर कोहणे ग्रामीण रुग्णालयात १६, तर खिरबिरे येथे १२ दाखल असून ५४ रुणांना दाखल करण्यात आले असून २०रुणांचे छाउगो ग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन याना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी संपर्क करून रूणाची माहिती देऊन उपचारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मवेशी (करबंदरा) येथे हळदी समारंभामध्ये जेवणामधून नागरिकांना विषबाधा झाल्याचे समजताच राजूर ग्रामीण हॉस्पिटल येथे तातडीने जाऊन रुग्णांची विचारपूस केली सिव्हील  सर्जन अधिकारी अहमदनगर, मा. जिल्हा आरोमा अधिकारी अहमदनगर तसेच राजूर येथील सर्व डॉक्टर यांना सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. विषबाधा झालेल्यांची नावे.

१) कृष्णा रामचंद्र भांगरे २) सार्थक भाऊ भांगरे ३) सखूबाई संजय कोडा(४) बुधाबाई शरद कोडात५) मुलाबाई अशोक कोडम६) तेजस शरद कोडार७) गणेश दौलत मोहडुळे ८) मनीषा शंकर भांगरे ९) देवकाबाई भाऊ भांगरे१०) सोलाजी बधा कबटे ११) समीर निवृत्ती भांगरे१२) निखिल चाळू भांगरे१३) हिराबाई बालू भांगरे१४) अलकाबाई शंकर भांगरे १५) तानाबाई नामदेव भांगरे १६) सविता सुरेश कडव १७) सीताराम गोगाजी मशाळ १८) मिराबाई नामदेव भांगरे १९) आदित्य गोरक्ष भांगरे २०) सुमन बाळू कोंडार २१) कोमल मच्छिद्र भांगरे २२) अशोक संतु सरफुले या बाबीस लोकांना विष बाधा झाली असून हा आकडा १००च्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजूर या आदिवासी भागातील अनेक वर्षांची राजूर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी होती, परंतु हे उपजिल्हा स्णालय अकोले येथे मंजूर झाल्याने या भागातील आदिवासी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे ही मागणी वारंवार केली असे माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले.

Web Title: 100 people poisoned by food in the turmeric program

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here