संगमनेर: मुलीला दुचाकीवर नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी
Breaking News | Sangamner: जायचे असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
संगमनेर: दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
१९ जुलै २०१३ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दहावीत शिकणारी पीडित मुलगी शाळेमध्ये जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यासाठी गेली होती. आरोपीने दर्शनाला जाऊन लगेच येऊ, असे म्हणत पीडित मुलीला फसवून बाहेरगावी नेऊन अत्याचार केला.
कुणाला सांगितले तर तुला महागात पडेल व मी तुझा कायमचा काटा काढील असा दम दिला. आई वडिलांच्या मदतीने पीडित मुलीने घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दिले
पांडुरंग यशवंत शेंगाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना काळात तो घरी आला होता. दरम्यान आरोपील पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर आरोपी ताब्यात घेऊन तुरुंगात रवाना केला होता.
दरम्यान, या खटल्याची सुनावण न्यायाधीश वाय.एच. अमेठ यांच्यासमोर सुरू होती. सहायक सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहताना सात जणांच्या महत्त्वपूर्ण साक्षी न्यायालयासमोर आणल्या दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अमेठा यांनी आरोपी पांडुरंग शेगाळ याला दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्य रकमेतील पंचवीस हजार रुपये पीडित मुलीला देण्याच्या आदेश न्यायालयाने दिले आहे.
Web Title: 10 years of hard labor for the murderer who took the girl on a bike and abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study