Home अकोले भंडारदरा, मुळा धरणातील पाणीसाठा, आवर्तनाबाबत काय? 

भंडारदरा, मुळा धरणातील पाणीसाठा, आवर्तनाबाबत काय? 

Breaking News | Akole: भंडारदरा आणि मुळा धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला.

What about water storage and circulation in Bhandardara

भंडारदरा:  अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, गावगावच्या पाणीयोजनासाठी लाभदायक ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन्हीही धरणात पाणीसाठा मुबलक आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 131 दलघफू पाण्याची आवक झाल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात सध्या 8440 दलघफू (76.46 टक्के) पाणीसाठा आहे.

निळवंडेतही धीम्या गतीने आवक सुरू असून पाणीसाठा 7253 दलघफू (87.18 टक्के) होता.पाणलोटात पावसाचे प्रमाण अल्प असलेतरी होत असलेल्या आवकेमुळे मुळा धरणात 19387 दलघफू (74.57 टक्के) पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे भरली असली, तरी गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून, याचा गांभीर्याने विचार करून हवामान खात्याच्या अधिकार्‍यांशी समन्वय साधून धरणांतील पाण्याच्या सिंचन व बिगर सिंचन आवर्तनाबाबत पुढील नियोजन केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Breaking News: What about water storage and circulation in Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here