Home अहमदनगर अहमदनगर: महिला माजी सरपंच यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अहमदनगर: महिला माजी सरपंच यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Ahmednagar News: पाणी भरण्यासाठी वीजपंप जोडताना विजेचा धक्का (electric shock) लागून खोकरच्या माजी सरपंच मदिना हुसैन सय्यद (वय ५०) यांचा मृत्यू.

Female former sarpanch dies due to electric shock

श्रीरामपूर: पिण्याचे पाणी भरण्यासाठी वीजपंप जोडताना विजेचा धक्का लागून खोकरच्या माजी सरपंच मदिना हुसैन सय्यद (वय ५०) यांचा मृत्यू झाला. काल सकाळी ही दुर्घटना घडली. काल दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांचा दफनविधी झाला. या घटनेने खोकर येथील व्यावसायिकांनी गाव बंद ठेवून सय्यद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

खोकर येथे दोन दिवसांपूर्वी वीज पडून एक शेतमजुरासह गाय मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

रविवार दि. १९ मार्चच्या सकाळी माजी सरपंच मदिना सय्यद या घरातील काम करत असताना पिण्याचे पाणी भरण्यासाठी घरातील वीजपंप लावण्याचा निर्णय घेतला. हा वीजपंप एक वर्षापासून बंद होता. तो सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच या पंपाची वीजवाहक तार त्यांच्या पायात घोटाळल्याने त्या खाली पडल्या. यादरम्यान विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी घरी त्यांची सून व नातवंडे होती. सुदैवाने यावेळी नातवंडे जवळ गेली नाही. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.. सलग दोन मृत्यूंमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समर्थक मदिना सय्यद यांनी सन २०१० ते २०१५ असे पाच वर्षे सरपंचपद भुषविले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परीवार आहे. माजी उपसरपंच हुसैन सय्यद यांच्या त्या पत्नी तर सद्दाम व ताहेर सय्यद यांच्या मातोश्री होत. याप्रकरणी साखर कामगार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी त्यांना यांचेकडील मेमोनुसार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष बढे करीत आहेत.

Web Title: Female former sarpanch dies due to electric shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here