प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, मृतदेहाजवळ असलेल्या….
Satara Murder News: तरुणीशी प्रेमसंबंध होते. याला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी दोघांना समजावून सांगितले होते. मात्र, मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या डोक्यातून राग गेलेला नव्हता.
सातारा: प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.
अभिषेक रमेश जाधव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गावातील लोक सकाळी शेताकडे जात असताना त्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे हा युवक खानापूर येथील अभिषेक जाधव (वय २०) असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. चौकशीत नापूरमधील रहिवासी असलेल्या रहीम नावाच्या युवकाने त्याला परखंदी परिसरात बोलावून नेल्याचे समजले. त्यानंतर मृतदेह आढळून आल्याने गावात संतापाची लाट उसळली.
अभिषेक हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, लहान बहीण आहे. मृतदेह गावात आणला तेव्हा आई व लहान बहिणीच्या हंबरड्याने परिसर गहिवरून गेला. खानापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाने कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केल. खानापूर गावाने त्वरित ग्रामसभेचे आयोजन करून गाव बंदचा निर्णय घेत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
अभिषेक जाधव याचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी दोघांना समजावून सांगितले होते. मात्र, मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या डोक्यातून राग गेलेला नव्हता. त्यातूनच हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
Web Title: youth was Murder in a love affair, the body was found
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App