अहमदनगर: उभ्या कंटेनरला दुचाकी धडकून युवक ठार
Breaking News | Ahmednagar Accident: एका हॉटेल जवळ अपघात होऊन एक ठार तर एक गंभीर जखमी झाला.
अहमदनगर: पांढरीपूल येथे अपघाताची मालिका सुरुच असून सलग दुसऱ्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या तीन अपघातांची घटना ताजी असतानाच त्या ठिकाणाहून अगदी काही अंतरावर असलेल्या एका हॉटेल जवळ अपघात होऊन एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
बेलपिंपळगाव येथील दोन युवक अहमदनगरकडे आपल्या दुचाकीवरून (एमएच १७ एएल ३८१७) निघाले होते. पुढे पांढरीपूल येथे एका हॉटेल समोर लोखंडी सळयांनी भरलेला कंटेनर (एमएच ४० वाय ८०४०) उभा होता. सुभाष आसाराम गारुळे व त्यांचा एक साथीदार असे दोन जण त्या वरती जाऊन आदळले. त्यामध्ये गारुळे मयत झाले तर साथीदार गंभीर जखमी झाला आहे.
ही अपघाताची मालिका अशीच सुरू राहिली तर पांढरीपूल ऐवजी मौत का कुआ असे नामकरण करावे लागेल. पर्यायाने या ठिकाणचा व्यवसाय देखील अडचणीत येईल. सुभाष गारुळे अहमदनगर ते संभाजीनगर हा हायवे असून कुठेही दिशादर्शक फलक त्याचप्रमाणे धोकादायक वळणे फलक असे कुठल्याही प्रकारे फलक लावण्यात आलेले नाहीत. याची शासनाने वेळीच दखल घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Web Title: youth was killed after a two-wheeler hit a vertical container
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study