Home क्राईम अवैध सावकारी वसुलीतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चार पानांची चिठ्ठी….

अवैध सावकारी वसुलीतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चार पानांची चिठ्ठी….

अवैध सावकारीतून वसुलीसाठी तगादा व घर बांधकामात झालेल्या आर्थिक फसवणुकीमुळे गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Youth commits suicide by hanging himself from illegal moneylender 

नागपूर: अवैध सावकारीतून वसुलीसाठी तगादा व घर बांधकामात झालेल्या आर्थिक फसवणुकीमुळे गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी १३ दिवसानंतर महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने अंकुश राऊत (२४) याने आत्महत्या करीत चार पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. नंदकिशोर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अंकुश हा उमरीतील एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करत होता. त्याने घर बांधकामासाठी मोठी उमरीतील विजय मालोकार याला ३ लाख रुपयांचे कंत्राट दिल्यानंतरही कंत्राटदार बांधकाम करीत नव्हता, तसेच पैसेही परत देत नव्हता, त्याचा भाऊ अजय मालोकारही पैसे परत करत नव्हता. अंकुशचा मित्र मनोज अळसपुरे याला अंकुश राऊतने अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या मंगला देशमुख हिच्याकडून १ लाख ६० हजार रुपये व्याजाने काढून दिले, मात्र मनोज अळसपुरे हा पैसा भरत नसल्यामुळे मंगला देशमुख ही अंकुशकडे पैशांसाठी तगादा लावत होती.

अंकुश त्या पैशांचे व्याज भरत होता. त्यानंतरही मंगला देशमुख त्याला शिवीगाळ करीत असल्याने तो तणावात होता. या चौघांमुळे अंकुशने आत्महत्या केल्याचे त्याचे वडील नंदकिशोर राऊत यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मोठी उमरीतील अवैध सावकारी व्यवसाय करणारी मंगला देशमुख, मनोज अळसपुरे, अंकुशच्या घराचे बांधकामाचे पैसे घेऊन काम न करणारे विजय व अजय मालोकार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अंकुशनेही चिठ्ठीत चौघांच्या नावांचा उल्लेख केला होता. सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Youth commits suicide by hanging himself from illegal moneylender 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here