Home पुणे लग्न केल्याचे भासवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार

लग्न केल्याचे भासवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार

Breaking News | Pimpri Crime: आमिष दाखवून लग्न न करता पत्नी सारखी वागणूक देत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित.

young woman was sexually assaulted by pretending to be married

पिंपरी:  लग्न केल्याचे भासवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा प्रकार ७ जुलै ते 14 नोव्हेंबर या कालावधीत चाकण येथे घडला. याप्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे,  आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गळ्यात माळा घालून लग्न झाल्याचे भासवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून लग्न न करता पत्नी सारखी वागणूक देत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: young woman was sexually assaulted by pretending to be married

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here