तरुणी घरात स्वयंपाक करत असताना अचानक भीषण स्फोट, तरुणीचा मृत्यू
Beed: स्वयंपाक करत असताना अचानक पेट (Fire) घेतल्याने घरातील ज्वलनशील पदार्थाचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू.
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंपाक करत असताना अचानक पेट घेतल्याने घरातील ज्वलनशील पदार्थाचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही दु्र्देवी घटना घडली. कमल आश्रुबा इंगळे (वय ३५, रा. आडस, ता. केज) असे मयत महिलेचे नाव, तर लोचनाबाई आश्रुबा इंगळे (वय ७० वर्ष) असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुणीचे वडील हे दिव्यांग असून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पान टपरी चालवतो व तेथेच पेट्रोल विक्रीसाठी ठेवतो. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरात मुलगी व आई दोघे मिळून स्वयंपाक करताना अचानक घराने पेट घेतला.
पेटते घर पाहून मायलेकींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक स्फोट झाला. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे कमल इंगळे या जळून जागीच ठार झाल्या तर आई भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे. पोलीस व धारुर अग्निशामक दल दाखल झाले आहे. या घटनेने आडस व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: a young woman was cooking in the house when a sudden explosion occurred
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App