Home महाराष्ट्र एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला…

एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल; घरातचं पंख्याला…

Breaking News | Solapur Crime: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. (Suicide).

young woman studying in her third year of MBBS takes Suicide

 

सोलापूर: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील हा प्रकार घडला. साक्षी सुरेश मैलापुरे असे मयत तरुणीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या साक्षीने आत्महत्या का केली? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेली माहिती अशी की, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५, रा. जुळे सोलापूर, आयएमएस शाळेजवळ) हिने राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना जुळे सोलापूर येथील आयएमएस शाळेसमोर काल (मंगळवारी, ता ७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीला आईला दिसले. त्यानंतर तत्काळ तिला नातेवाइकांच्या साहाय्याने फासातून सोडवून शासकीय शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी (ता. ७ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर साक्षी आपल्या कुटुंबासह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, साक्षीने छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने  गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घरात आईने हा प्रकार पाहिला आणि तत्काळ नातेवाइकांच्या मदतीने तिला फासावरून खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

साक्षी ही अभ्यासात अत्यंत हुशार, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू.

Breaking News: young woman studying in her third year of MBBS takes Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here