मद्य पाजून तरुणीचे तोंड दाबत अत्याचार; दोघे पसार
Breaking News | Nashik Crime: वीस वर्षीय मैत्रिणीशी शालेय आठवणी ताज्या करत मित्राने लॉजवर नेत मद्य पाजून तिच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

नाशिक: गंगापूररोड भागात राहणाऱ्या वीस वर्षीय मैत्रिणीशी शालेय आठवणी ताज्या करत मित्राने लॉजवर नेत मद्य पाजून तिच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मित्राने मद्याच्या नशेतील मैत्रिणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये कैद करून ते मित्राला पाठवले. यानंतर या मित्रानेही व्हिडिओ डिलिट करण्यासाठी ब्लॅकमेल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा तरुणीने केला आहे. त्यानुसार विवेक देवकाते (२१) व सुमीत या दोघा संशयित मित्रांवर गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या शिक्षेसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडितेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, तिची ओळख नववी ते दहावीच्या शालेय शिक्षणादरम्यान देवकाते याच्याशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. यानंतर दोघांत व्हॉटस्अॅपसह इन्स्टाग्रामवर मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू झाले. ते सुरू असतानाच ७ नोव्हेंबर २०२५ रोजी देवकाते याने तिला फोन करून भेटण्यास बोलवले. पीडिता तयार झाली असता दोघेही दुपारी मोपेडवरून गंगापूर बॅकवॉटरला फिरण्यासाठी गेले. तेथे दोघांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून फोटो काढले. त्यानंतर सायंकाळी घरी परतले. तेव्हा देवकाते याने सायंकाळी सहा वाजेनंतर तरुणीस फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तिने प्रारंभी नकार दिला. मात्र, देवकातेने तिचे मनपरिवर्तन करून बोलावून घेतले.
Breaking News: Young woman forced to drink alcohol and abused both escape
















































