लोखंडी रॉड डोक्यात घालून तरुणाची हत्या
Breaking News | Pune Murder: एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना.
पुणे : एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३, रा. रामटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फरहानचा भाऊ फरीद शेख याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर दिलीप चव्हाण आणि भैय्या ऊर्फ प्रसाद विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फरहानला दारू पिण्यासाठी नेले. खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा राग मनात धरून फरहानच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या फरहानचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे पटरीवर फेकून दिले. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: young man was killed by an iron rod on his head
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study