लग्नाचे आमिष दाखवून मुलीस पळवून नेत असणाऱ्या तरुणाला अटक
Shrirampur Crime: abducting शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.
श्रीरामपूर: येथील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवर एक १७ वर्षाची तरुणी व एक तरुण संशयितरीत्या थांबलेले होते. काही कार्यकर्त्यांना संशय आल्याने दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात. त्याचे नाव अबुजर अन्सार शेख (रा. एकवाडी, हरेगाव) असे असून तो एका मोबाइल शॉपीत काम करतो.
मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे. ४ सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता १७ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळून नेण्याचा प्रयत्न आरोपीने केला, असे त्यात म्हटले आहे.
श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर एक 17 वर्षीय मुलगी आणि एक तरुण संशयितरित्या उभे होते. या दोघांच्या हालचालीवरून संशय काहींना आला. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील काही सतर्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांना घेऊन पोलीस ठाणे गाठून पोलिसांच्या हवाली केले.
Web Title: a young man was arrested for abducting a girl by luring her into marriage