संगीत शिकवता शिकवता हृदयाचे तारं छेडले, मग प्रेमात तरूणीसोबत भयंकर घटना
Breaking News | Nagpur Crime: तरूणाने पीडीत तरूणीला हॉटेलवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना.

नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने आधी इस्टाग्रामवर तरूणीशी मैत्री केली.या मैत्रीचे पुढे जाऊन प्रेमात रूपांतर झाले होते. त्यानंतर तरूणाने पीडीत तरूणीला हॉटेलवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेला कंटाळून अखेर 26 वर्षीय पिडीत तरूणीने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी तरूण हा संगीत शिकवण्याचं काम करतो. त्याचं स्वत:चा एक क्लासेस देखील आहे. एके दिवशी त्याची इंस्टाग्रामवर एका तरूणीशी मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर दोघांनी एकमेकांशी चॅट करण्यास सूरूवात केली होती. यानंतर ही मैत्री पुढे जाऊन आणखीणच घट्ट होत गेली. आरोपीचं गाण शिकवण्याचं काम तरूणीला आवडायचं म्हणून तरूणीने त्याच्यासोबत एकत्र काम करायला सूरूवात केली होती.
या कामामुळे दोघं आणखीणच जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात देखील पडले होते.त्यानंतर एप्रिल 2025ला आरोपी पिडीत तरूणीला हॉटेल पॅरेडाईसवर घेऊन गेला होता.यावेळी हॉटेलवर आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार केला होता.
या घटनेनंतर पीडित तरूणी प्रचंड घाबरली होती. पण तिने स्वत:ला धीर दिला कारण तिच्या प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. पण त्यावेळेस तिला या गोष्टीचे अजिबात कल्पना नव्हती की आरोपी लग्नाच्या आमिषाच्या नावाखाली तिच्यासोबत बलात्कार करतोय. पुढे जाऊन अशाच प्रकारे तरूणीला हॉटेलवर नेऊन त्याने वारंवार तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते.
दरम्यान काही महिन्यानंतर पीडितेने वारंवार लग्नाविषयी विचारल्यावर आरोपी टाळाटाळ करू लागला.त्यामुळे पीडितेच्या मनात पाल चुकचुकली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरूणाविरूद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रशांत मराठे (वय 28) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
Breaking News: young man took the victim to a hotel and repeatedly raped her on the pretext of marriage
















































