Home कोल्हापूर पत्नीला व्हिडियो कॉल करीत तरुणाची आत्महत्या

पत्नीला व्हिडियो कॉल करीत तरुणाची आत्महत्या

Breaking News | Suicide Case: छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना.

Young man commits suicide while video calling his wife

नागाव : छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केली. अभिजित दत्तात्रय माने (वय ३८, रा. एकता कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अभिजित माने हा सध्या फॅब्रिकेशनचे काम करत होता. फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो सध्या पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुलाची शिरोली येथे घरी आला होता. पण, त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती.

माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी गेली असल्याचे समजते. आज दुपारी घरी बिर्याणी करीत असताना अभिजितने पत्नीला व्हिडिओ कॉल केला. ‘तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार,’ असे तो पत्नीला सांगत होता.

हे सांगत असताना त्याने बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला. प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

Web Title: Young man commits suicide while video calling his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here