खळबळजनक घटना: पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाची आत्महत्या
अहमदनगर | Suicide: अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातच बाथरूममध्ये लुंगीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुण हा कोण आहे, कोठून आला याबाबत अजून उलगडा झाला नाही.
ठाण्याच्या परिसरात दुर्गंधीचा वास येऊ लागल्यानंतर आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.
कोतवाली पोलीस ठाणे आवारात असलेल्या बाथरूमचा वापर कमी प्रमाणात होतो. याच बाथरूममध्ये तरूणाने लुंगीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती असून ही घटना साधारण दोन दिवसांपूर्वी घडली असावी, अशी शक्यता पोलीस व्यक्त करत आहे. या आत्महत्या मागील कारण काय आहे. तसेच त्याचे ओळख पटविण्याचे तपास कोतवाली पोलीस करीत आहे.
Web Title: Young man commits suicide in police station premises