अहिल्यानगर: श्रीरामनवमी यात्रेत तरुण पिस्तुल घेऊन आला अन…
Breaking News | Ahilyanagar: श्रीरामनवमी यात्रेमध्ये थत्ते मैदानावर रहाट पाळणा परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. चार काडतुसेही मिळाली.
श्रीरामपूर: शहरातील श्रीरामनवमी यात्रेमध्ये थत्ते मैदानावर रहाट पाळणा परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चार जिवंत काडतुसेही मिळून आली आहेत. आरोपीचे नाव मनोज संजय साबळे (वय २३, रा. साईमंदिर, डावखर रोड) असे आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमोल गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके, उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांना साबळे याच्याबाबत माहिती मिळाली होती. थत्ते मैदानावर रहाटपाळणे थाटण्यात आले आहेत. तेथे कंबरेला विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून एक तरुण फिरत असल्याचे गुप्त बातमीदाराकडून समजले होते. त्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली, त्यावेळी जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. त्याची झडती घेतली असता पिस्तूल व चार जिवंत काडतुसे मिळून आली. मनोज संजय साबळे अशी तरुणाने आपली ओळख सांगितली. यावेळी दोन पंचही पोलिसांसोबत हजर होते.
पिस्तुलावर मेड इन यूएसए असे लिहिलेले आहे. ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व प्रत्येकी एक हजार रुपयांची काडतुसे ताब्यात घेण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत अमोल पडोळे, सागर बनसोडे, संपत बड़े, पंकज सानप हे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. ऐन श्रीरामनवमी यात्रेमध्ये पिस्तूल मिळून आल्याने यात्रेतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यात्रेत हजारो नागरिक राहटपाळणे व इतर खेळणीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करीत आहेत.
पिस्तूल व प्रत्येकी एक हजार रुपयांची काडतुसे ताब्यात घेण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत अमोल पडोळे, सागर बनसोडे, संपत बड़े, पंकज सानप हे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. ऐन श्रीरामनवमी यात्रेमध्ये पिस्तूल मिळून आल्याने यात्रेतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यात्रेत हजारो नागरिक राहटपाळणे व इतर खेळणीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करीत आहेत.
Web Title: young man came with a pistol during the Sri Ram Navami pilgrimage