Home अहिल्यानगर अहिल्यानगर: दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील!  नितेश राणेंवर हल्लाबोल

अहिल्यानगर: दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील!  नितेश राणेंवर हल्लाबोल

Breaking News | Ahilyanagar Waris Pathan on Nitesh Rane :   सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं.

You will come on two legs and go on a stretcher! Attack on Nitesh Rane

अहिल्यानगर: :  एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगरमधील मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं. येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणेंवर हल्लाबोल केला.

भाजपचे काही लोक द्वेष पसरवत असल्याचे वारीस पठाण म्हणाले. यावेळी बोलताना मंत्री वारीस पठाण यांनी नेपाळी म्हणत नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी राणेंवर टीका केली. लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांसाठी एमआयएम कायम तयार असल्याचे वारीस पठाण म्हणाले.

आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहोत, तरीदेखील आमच्यालोकांना अटक केली जात असल्याचे पठाण म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण खराब होईल असे आपल्यालाला कावाटते? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. विकासावर बोलण्यात यांच्याकडे काहीच नाही. हे सर्व लोक फेल झाले आहेत. यांचे एकच काम आहे, ते म्हणजे द्वेष पसरवणे असे पठाण म्हणाले. यावेळी पठाण यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. 70 वर्ष जे सत्तेत बसले त्यांनीही आमच्यासाठी काही केलं नसल्याचे पठाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकाही मुस्लिम नेत्याला तिकीट दिलं नाही. हे भविष्यात आपल्याला काय देणार? असा सवाल देखील पठाण यांनी उपस्थित केला.

असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही नरेंद्र मोदींसारखे खोटे बोलणं शिकला आहात. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना केवळ मदत नाही तर कर्जमाफी हवी आहे. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असताना उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कर्जमाफीची मागणी केली होती. आता तुम्ही सत्तेत आहात, तर तुम्ही स्वतः कर्जमाफी करा, असे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.

Breaking News: You will come on two legs and go on a stretcher! Attack on Nitesh Rane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here