बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून खुली ऑफर
Ahmednagar News Balasaheb Thorat: भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेतील गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आता थोरातांचं पुढचं पाऊल काय? यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान शिंदे गटानंतर आता भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी देखील पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. राम शिंदे शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी साधला यावेळी ते म्हणाले, केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. तसेच भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळे कोणत्याही पक्षातील कोणी नेते दु:खी, किंवा अडचणीत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना भाजप आसरा देण्यासाठी तयार आहे, असं म्हणत राम शिंदे (Ram Shinde) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना खुली ऑफर दिली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते निवडून आले.
Web Title: open offer from BJP after the resignation of Balasaheb Thorat
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App