Home अहमदनगर अहमदनगर: ऊसाच्या शेताजवळ महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर: ऊसाच्या शेताजवळ महिलेचा मृतदेह आढळला

Breaking News | Ahmednagar: उसाच्या शेताजवळ 60 वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

woman's body was found near a sugarcane field

सोनई:  नेवासा तालुक्यातील सोनई जवळील झापवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, झापवाडी शिवारातील कॅनॉल जवळील अशोक शिंदे यांच्या उसाच्या शेताजवळ 60 वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सोमवार दि. 16 रोजी सकाळी 8 वाजता आढळून आला.

नऊवार साडी, केसाला लाल रंग, उजव्या हातावर तुळशीचे पान गोंदलेले, गळ्यात स्कार्फ व त्यावर लाल रंगाचे फुले असे वर्णन आहे. सोनई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून सदर महिलेस ओळखत असणार्‍यांनी सोनई पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी केले आहे.

Web Title: woman’s body was found near a sugarcane field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here