अहिल्यानगर: घरात घुसून महिलेचा विनयभंग
Breaking News | Ahilyanagar Crime: एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना.
अहिल्यानगर: केडगाव परिसरात एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (26 मार्च) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने फिर्याद दाखल केली आहे. ईश्वर अशोक पाचारणे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आपल्या पती, सासू व दोन मुलांसह केडगाव उपनगरात राहतात. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्या स्वयंपाक घरात काम करत असताना ईश्वर अशोक पाचारणे हा अचानक त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादीसोबत जबरदस्ती केली.
या प्रकारामुळे फिर्यादी यांना मनस्ताप झाला आणि त्यांनी प्रतिकार करत त्याचे हात झटकले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता संशयित आरोपीने दरवाजा उघडून घरातून पळ काढला. घाबरलेल्या फिर्यादी यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या सासूला फोनवर सांगितला आणि नंतर हिंमत करून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी ईश्वर अशोक पाचारणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Woman molested after entering house