Home अहिल्यानगर शिर्डीतून गायब झालेली महिला, प्रियकरासोबत फरार

शिर्डीतून गायब झालेली महिला, प्रियकरासोबत फरार

Woman missing from Shirdi absconding with boyfriend

शिर्डी | Shirdi: शिर्डी येथून बेपत्ता असलेली इंदोरची महिला प्रियकरासोबत फरार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, साडे तीन वर्षापूर्वी इंदोर रा. मध्यप्रदेश येथील महिला आपल्या पती व मुलांसोबत   शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर बाजारपेठे तून सदर महिला ही गायब झाली होती. तिच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती.

याप्रकरणी शिर्डी पोलीस योग्य प्रकारे तपास करीत नाही. असे शिंतोडे उडवत तिच्या पतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तसेच शिर्डीत मानवी तस्करीचे पथके आहेत का याबाबत तपास करण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर मागील पंधरवाड्यात दिनांक १७ डिसेंबर रोजी सदर महिला ही इंदोर येथेच आढळून आली. इतके दिवस ही महिला कोठे होती याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. काळे यांनी सांगितल्याप्रमाणे ही महिला स्वतःच शिर्डीतून निघून गेली. तेथून ती प्रियकर ओमप्रकाश चंदेल याला जावून भेटली. मग ते दोघे मध्यप्रदेश येथे गेले. चंदेल याच्याशी प्रेमसंबध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चंदेल यास वारंवार विचारणा होत असल्याने यात आपण फसू या भीतीने चंदेल याने स्मृतीभंश झाल्याचे नाटक करायला सांगितले. व तिला इंदोरला बहिणीच्या गल्लीत आणून सोडले. यानंतर ती बहिणीला भेटली. पोलिसांनी तिला शिर्डीला आणून औरंगाबाद उच्च न्यायालयासमोर हजर केले आहे.  

Web Title: Woman missing from Shirdi absconding with boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here