Whether alert: थंडी लांबणीवर: या जिल्ह्यांत पुन्हा पाउस पडणार
अहमदनगर | Whether alert: अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थंडी पुन्हा लांबणीवर पडणार आहे.
नाशिक जिल्ह्याला ऐन दिवाळीत शुक्रवार, शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे.
आता दिवाळीनंतर तरी थंडी वाढेल असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
10 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळ आणि माहेमध्ये सोमवारी, तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात सोमवारी आणि मंगळवारी पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Web Title: Whether alert it will rain again in Ahmednagar