Home अहमदनगर Rain Alert: नगरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Rain Alert: नगरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Weather Forecast rain in these districts including Ahmednagar

मुंबई | Weather Forecast: राज्यात कमालीचा उकाडा वाढला आहे. वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस (Rain) अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर (Monsoon) कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तविला आहे. मान्सून यंदा वेळेतच दाखल होणार आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Weather Forecast rain in these districts including Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here