Home संगमनेर संगमनेर: कृषी सेवा केंद्राला आग, जळून खाक, लाखोंचे नुकसान

संगमनेर: कृषी सेवा केंद्राला आग, जळून खाक, लाखोंचे नुकसान

Breaking News  | Sangamner: संगमनेर रोडलगत असलेल्या वीरभद्र कृषी सेवा केंद्राला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अचानक आग.

Virbhadra Krishi Seva Kendra was gutted by fire

संगमनेर: तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील चौफुली येथे संगमनेर रोडलगत असलेल्या वीरभद्र कृषी सेवा केंद्राला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने या भीषण आगीत वीरभद्र कृषी सेवा केंद्र जळून खाक झाले.

साकूर जवळील चिंचेवाडी येथे वास्तव्यास असलेले शेतकरी विकास खेमनर यांचा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. सायंकाळी त्यांचा मुलगा विकास दुकान बंद करून घरी गेला. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्यांच्या वीरभद्र कृषी केंद्राला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही तासांत दुकानातील खते, औषधे, फर्निचर, सीसीटीव्हीसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना मिळताच पोलीस फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु अपयश पदरी पडले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झाले. या भीषण आगीत जवळपास २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले. ही आग नेमकी काय कारणाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Web Title: Virbhadra Krishi Seva Kendra was gutted by fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here