Home महाराष्ट्र विरारमध्ये कोविड सेंटरला आग, १३ रुग्ण मृत्यूमुखी

विरारमध्ये कोविड सेंटरला आग, १३ रुग्ण मृत्यूमुखी

Virar Hospital Fire updates

Virar Hospital Fire updates: नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या घटनेमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही घटना ताजी असतानाचा विरारमधील एका कोविड सेंटरळा भीषण आग लागल्याने १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात ही आग लागली. या कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीनंतर अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री: या रुग्णालयातील आगीत मृत्यूमुखीं झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

अजित पवार: विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले; ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्युमुखी पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील,याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.रुग्णालयांची सुरक्षितता,फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे.

पंतप्रधान: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मयत कुटुंबियांना २ लाखांची व जखमी रुग्णांना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे.  

Web Title: Virar Hospital Fire updates

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here