संतापजनक! महिलेवर अत्याचार करून त्यानंतर अत्याचाराचा व्हिडियो गावात व्हायरल
औरंगाबाद: औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील घोसला गावात एका ४० वर्षीय महिलेच्या मुलास आणि भावास जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करून अत्याचाराचा (abusing) व्हिडियो तयार करून गावात प्रसारित केला. महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीच्या बदल्यात तिच्या पोटावर बिबा चोळून त्वचा जाळली. १० जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आबा अंबादास कोळी रा. घोसला ता. सोयगाव जि. औरंगाबाद असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला लग्नसमारंभातून घरी जात असताना कोळी याने दुचाकी आडवी लावून तिचा रस्ता अडवला. बहिणीच्या घरी सोडून देतो असे सांगितले. मात्र महिलेने नकार दिला. त्यामुळे तिच्या मुलाला आणि भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेला बळजबरीने दुचाकीवर बसवले. यानंतर तब्बल बारा किलामीटर लांब असलेल्या घोसला (ता. सोयगाव) गावातील त्याच्या शेतात पिडीत महिलेला घेऊन गेला. त्यांनतर महिलेवर अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचा व्हिडीओ (Porn Video) स्वत:च्या मोबाइलमध्ये बनवून ठेवला.
आरोपीने पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती प्रचंड घाबरून गेली. त्यामुळे घडलेला प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. मात्र त्यांनतर चार दिवसांनी आरोपीने गावातील लोकांच्या मोबाईलवर अत्याचाराच्या व्हिडिओ व्हायरल केला. पाहता-पाहता व्हिडिओ संपर्ण गावात व्हायरल झाला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: video of the woman being abusing and then went viral in the village