Home क्राईम संगमनेर: अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळवून नेले, मैत्रिणीकडे जाते असे सांगून…

संगमनेर: अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळवून नेले, मैत्रिणीकडे जाते असे सांगून…

Sangamner Crime:  एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून (abducted a minor girl) नेल्याची घटना.

unknown person abducted a minor girl crime filed

संगमनेर: संगमनेर तालुक्यात राजापूर येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. शहरानजीकच्या राजापूर येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, नोकरी निमित्ताने नासिक येथे राहत असलेल्या व्यक्तीचे राजापूर येथील कुटुंबीय घोटी येथे नातेवाईकाकडे गेले होते. पावेळी राजापूर येथील घरी पुतण्या आणि पुतणी होते ४ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदाराची पुतणी मैत्रिणीकडे जाते असे तिच्या भावाला सांगून घराबाहेर गेली.

मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती आढळून आली नाही त्यामुळे नातेवाईकांकडे देखील शोध घेतला मात्र त्याना देखील काही माहिती कळविल्याने नाशिक येथील बेपत्ता झालेल्या आपल्या पुतणीचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी कारणासाठी पळवून नेते असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Earn Money online | फेसबुक वरून कसे पैसे कमवितात | How to earn money from facebook in Marathi

सोळा वर्ष आठ महिने वयाची मुलगी बेपत्ता झाल्या संदर्भात तसेच तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याबाबत शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ नुसार नज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: unknown person abducted a minor girl crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here