संगमनेर: बसस्थानक परिसरात दोन तरुणांना मारहाण
Breaking News | Sangamner: बसस्थानक परिसरात दोन तरुणांना मारहाण.
संगमनेर: शहरातील बसस्थानक परिसरात दोन तरुणांना शनिवार दि. २३ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मारहाण झाली. हा संदेश पसरताच दोन समूहांचे तरुण गोळा झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, ही मारहाण कोणत्या कारणातून झाली हे समजू शकलेले नाही.
याबाबत समजलेल्या माहितीनुसारी बसस्थानकावर दोन तरुणांना मारहाण झाली. ही वार्ता पसरताच बसस्थानकावर दोन समूहांची मोठी गर्दी झाली. पोलिसांना देखील याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुक्याचे देवीदास ढुमणे यांच्यासह अतिरिक्त कुमक तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. याचबरोबर घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतले आहे. गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करुन जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
यावेळी दोन्ही समूहातील प्रतिनिधींशी चर्चा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनाही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
Web Title: Two youths were beaten up in the bus stand area
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study