Home संगमनेर संगमनेर: जुन्या वादातून दोघांना सशस्र मारहाण, ११ जणांवर गुन्हा,  पाच जणांना अटक

संगमनेर: जुन्या वादातून दोघांना सशस्र मारहाण, ११ जणांवर गुन्हा,  पाच जणांना अटक

Breaking News | Sangamner Crime: कोयत्याने वार करत डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना.

two were beaten up, 11 people were charged, five people were arrested

संगमनेर: जुन्या वादातून जमाव जमवून एका कोयत्याने वार करत डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना अटक केली आहे. सदरची घटना मंगळवारी रात्री शहरालगत असणाऱ्या लक्ष्मी नगर परिसरात घडली.

याबाबत हुसेन  बाबमिया शेख (वय १९) रा. तिरंगा बीक, संगमनेर याने संगमनेर शहर पोलिसात फिर्यादी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गोट्या घेगडमल , निलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे, साहिल देव्हारे ऋषी धीमते, अरबाज पठाण प्रथमेश अशोक पावडे, सनी शेखर तरटे , अविनाश मंडलिक आणि सौरभ राजेंद्र फटांगरे (सर्व रा. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

जमावाच्या मारहाणीत हुसेन बाबामियां शेख हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मित्राला भेटण्यासाठी गेला असता त्याला होत असलेली मारहाण पाहून त्याला वाचवण्यासाठी हुसेन शेख मदतीला गेला आणि भांडणांमध्ये मध्यस्थी करू लागल्याने जमलेल्या तरुणांच्या जमावाने त्यालाही मारण्यास सुरुवात केली. तसेच या बेदम मारहाणीत त्याच्यावर कोयत्याने वार करीत काठ्या व दगडांनी जोरदार प्रहार करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला.  या मारहाणीमुळे हुसेन शेख हा गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: two were beaten up, 11 people were charged, five people were arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here