अहिल्यानगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: अज्ञात वाहनाने पाठी मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युतकांचा जागीच मृत्यू.

कर्जत : नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठी मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युतकांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि. १०) सकाळी चापडगाव शिवारात ही घटना घडली.
जातेगाव (ता. करमाळा) येथील तीन युवक नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात होते. चापडगाव शिवारात पाठीमागून आलेल्या
अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील नीलेश सुरेश पोळ (वय २२) व स्वागत बाळू ससाणे (वय १८, दोघे रा. जातेगाव, ता. करमाळा) हे जागीच ठार झाले, तर अक्षय लक्ष्मण जगताप हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने उपचारासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातस्थळी पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी भेट देऊन पाहणी केली. कर्जत पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णवाहिका चालक मेहराज पठाण यांनी अपघातस्थळी जाऊन मदत केली.
Breaking News: Two people on a two-wheeler died in a collision with an unknown vehicle
















































