Home पुणे पुणे हादरले! दोन खुनाच्या घटना, भर चौकात डोक्यात दगड घालून खून

पुणे हादरले! दोन खुनाच्या घटना, भर चौकात डोक्यात दगड घालून खून

Breaking News | Pune Crime: दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन खुनाच्या घटनांनी पुणे हादरले.  

Two murder incidents, murder by stone on head in Bhar Chowk

पुणे: खुनाच्या घटनांनी पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून झाले. आज सकाळच्या सुमारास या घटना उघडकीस आले आहे.

कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर आज (ता.१३) सकाळी अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांनी दिली आहे. मनोहर बागल असे मृत व्यक्तीचे नाव असून गुन्ह्याचे कारण समजू शकले नाही.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाजी मंडई परिसरात घडली. रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ज्याचा खून झाला तो गवंडी काम करत होता. घरात न झोपता तो बाहेरचं झोपायचा. शुक्रवारी रात्री देखील कात्रज परिसरातील मंडई जवळ असणाऱ्या रस्त्यालगत झोपला होता. त्यावेळी गाढ झोपेत असताना एका व्यक्तीने त्याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

दुसरी घटना लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री अरबाज शेख नामक तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अरबाज शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली होती. यातून त्याची काही दिवसांपूर्वी सुटका झाली होती. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री त्याच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Two murder incidents, murder by stone on head in Bhar Chowk

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here