Home Accident News अकोलेतील घटना: चालू  बसमधून रस्त्यावर पडून दोन विद्यार्थिनी जखमी

अकोलेतील घटना: चालू  बसमधून रस्त्यावर पडून दोन विद्यार्थिनी जखमी

Akole News: अकोलेहून कोतुळकडे जाणाऱ्या एसटी बसचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने अपघाताची (Accident) घटना.

Two female students injured after falling on the road from running bus Accident

अकोले: तालुक्यातील वाशेरे घाटात अकोलेहून कोतुळकडे जाणाऱ्या एसटी बसचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने अपघाताची घटना घडली आहे.  बसच्या पायरीवर उभ्या राहून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्याने हा  अपघात झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. अपघातातील दोन्ही जखमी विद्यार्थिनी शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वैष्णवी गोरक्षनाथ गायकवाड (रा. पिंपळगाव खांड) व प्रियांका संजय डोंगरे (रा. पांगरी) असे या जखमी झालेल्या विद्यार्थिनीची नावे आहेत.

सोमवारी सायंकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनी अकोले- कोतूळ बसमध्ये  नेहमीप्रमाणेच प्रवाशांनी गच्च भरलेली होती. या दोघी दुसऱ्या पायरीवर उभ्या एसटीने प्रवास करीत होत्या.  वाशेरे घाटाच्या शेवटच्या वळणावर बस वळताना हेलकावा बसल्याने प्रवासी दरवाजावर आदळले. यात दरवाजा उघडला गेला व दोन मुली रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्या. जखमींवर अकोले येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Web Title: Two female students injured after falling on the road from running bus Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here