मतदानाला एक दिवस बाकी असतानाच अहमदनगरमध्ये राडा, दोन गट एकमेकांना भिडले
Breaking News | Ahmednagar: मतदानाच्या एक दिवस आधी अहमदनगरमध्ये एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला.
अहमदनगर: लोकसभा निवडणुकीमुळे कडकडत्या उन्हाळ्यात राज्याचं राजकीय वातवरणही तापलेलं बघायला मिळत आहे. विविध पक्षांच्या जोरदार प्रचासभा, मिरवणुका निघत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
महाराष्ट्रात उद्या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होईल. पण मतदानाच्या एक दिवस आधी अहमदनगरमध्ये एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहे.
अहमदनगरला दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हा राडा वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर यांच्या गटात ही हाणामारी झाली. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फुटले आहे. तसेच एक स्कार्पिओदेखील फोडण्यात आलीय. अहमदनगरच्या मंगलगेट परिसरात ही हाणामारी झाली आहे.
या हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या तिथे तणावपूर्व शांतता बघायला मिळत आहे. पोलिसांकडून परिस्थिती पुन्हा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. पोलिसांची मोठी व्हॅन आणि फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे.
Web Title: two factions clashed in Ahmednagar with just a day left for polling
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study