विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला अटक
Breaking News | Pune Crime: विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक.

पुणे : विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सुरेश असे अटक करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी आरोपी सुरेश याच्याकडे शिकवणीला यायची. स्वारगेट भागात आरोपी खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्या वेळी आरोपीने मुलीशी संवाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने माहिती कुटुंबीयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
Breaking News: Tutor arrested for sexually assaulting student
















































