अहमदनगर: ट्रकचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: एका ट्रक चालकाने भेंड़ा येथे झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नेवासा: तालुक्यातील तेलकुड़गाव येथील एका ट्रक चालकाने भेंड़ा येथे झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर आत्महत्येबाबत मयताच्या मुलाने संशय व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील तेलकुड़गाव येथील ट्रक चालक भाऊसाहेब विश्वनाथ थोरात (वय ५३) यांचा मृतदेह भेंडा ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगार वसाहतीतील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताचे खिशात आधार कार्ड व एक चिठ्ठी आढळून आली की,त्या चिठ्ठीत लिहिले आहे मी नॅशनल हायवेवरील एक ट्रक ड्रायव्हर आहे. पण केंद्र सरकारने केलेल्या ड्रायव्हर विरोधी कायद्याने पूर्ण खचून ट्रक बंद केला आहे. देशातील इंदौर हैदराबाद अशा शहारामध्ये ट्रान्सपोर्टर आम्हाला १०० लिहून मागत आहे की केंद्र सरकारच्या या कायद्याप्रमाणे तुम्हाला काम करावे लागेल. अपघात झाल्यास तुम्हाला ७ लाख रुपये दंड व १० वर्षे कैदेत राहावे लागेल. आम्ही पेशंटला दवाखान्यात नेऊ पण लोकांनी आम्हाला जीवंत ठेवले तर.. अनेक प्रयत्न करूनही मला रेशनकार्ड मिळालेले नाही. माझा एक मुलगा मतिमंद असून त्याला शासनाकडून मानधन मिळत नाही. पैसे नसताना मी इंदौरवरुन उपाशी इथपर्यंत आलो. घरच्याना सांगा माझा कोणताच विधी करू नका, परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा उल्लेख आहे.
दरम्यान ही चिठ्ठी माझ्या वडिलांची नाही, माझे वडील कमी शिकेलेले आहेत, या चिठ्ठीतील हस्ताक्षर माझ्या वडिलांचे नाही असे सांगून मृत्यू बाबत मयताच्या मुलाने पोलीस यंत्रणेकडे संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार रामेश्वर घुगे पुढील तपास करत आहेत.
Web Title: Truck driver committed suicide by hanging himself from a tree
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News