अहमदनगर: ट्रक-कारचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार
Breaking News | Ahmednagar: नगर मनमाड महामार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यात पती पत्नी जागीच ठार.
अहमदनगर: नगर मनमाड महामार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यात पती पत्नी जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डी कडून नगरकडे जात असलेल्या अल्टो कार (क्र. एमएच १४ एव्ही ३३७२) ला नगरकडून शिर्डी कडे जात असणाऱ्या माल वाहतूक ट्रकने समोरून जोराची धडक दिली असता अल्टो कार मधील दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे (दोघेही राहणार ममदापूर, बाभळेश्वर) हे दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले आहेत.
नगर-मनमाड रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. तसेच एकेरी वाहतूक सुरु आहे.दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिक मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
Web Title: truck-car accident Husband and wife were killed on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study