Home महाराष्ट्र तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन

तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन

Breaking News | Satara Crime: एका अल्पवयीन मुलीने तरूणाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय.

trouble of the young man, the minor girl ended her life

सातारा: बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसत आहेत. राज्यभरातून लहान मुली, तरूणी आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशातच सातारामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलीने तरूणाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेने सातऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोवई नाक्यावर पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली.

साताऱ्यामध्ये काही दिवसापासून संशयित आरोपी हा पीडित मुलीला वारंवार त्रास देत होता. त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होती. मात्र काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातील लोकांना धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी  सखोल तपास पोलीस करत आहेत.

Web Title: trouble of the young man, the minor girl ended her life

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here