Home अहमदनगर अहमदनगर: रेल्वेचे डबे पुणतांब्याजवळ घसरले

अहमदनगर: रेल्वेचे डबे पुणतांब्याजवळ घसरले

Breaking News | Ahmednagar: दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा आणि कोपरगावच्या मध्ये असलेल्या कान्हेगाव स्टेशनजवळ मालवाहू रेल्वेचे डबे घसरल्याची घटना.

Train coaches derailed near Punatamba

पुणतांबा | अहमदनगर: दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा आणि कोपरगावच्या मध्ये असलेल्या कान्हेगाव स्टेशनजवळ मालवाहू रेल्वेचे डबे घसरल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक रात्री उशिरापर्यंत थांबली होती. दौंडकडून मनमाडच्या दिशेने जाणारी मालवाहू रेल्वे गाडी पुणतांब्यापासून पुढे दहा किलोमीटर असलेल्या कान्हेगाव स्टेशनजवळ आली असता रेल्वेचे काही डबे घसरले.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने या मार्गावर येणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान रात्री दहाच्या सुमारास दादर व झेलम एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्या पुणतांबा स्टेशनवर तातडीने थांबविल्या, नगर रेल्वेस्थानकावरही काही गाड्या थांबल्या. किती डबे घसरले, याची माहिती मिळाली नाही. मात्र हे डबे बाजूला करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले होते. या घटनेमुळे मात्र रेल्वे प्रवाशांची रात्रीच्या वेळी मोठी गैरसोय झाली.

Web Title: Train coaches derailed near Punatamba

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here