अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक संस्था सामाजिक जाणिवेतून पुढे
अकोले प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक संस्था सामाजिक जाणिवेतून पुढे आल्या आहेत. आता अकोले मध्ये डॉ.भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या शासकीय कोव्हीड हॉस्पिटल साठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अमृतसागर दूध संघाने 25 कोरोना रुग्णांसाठी दोन वेळेस जेवणाची सोय, दोन वेळेस चहा व एकवेळ नास्ता याची सोय करून महत्वाचे पाऊल उचललेले आहे.
अगस्ति सह साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजीमंत्री मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष सीताराम पा.गायकर व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अगस्ति सह साखर कारखान्याचे वतीने विठ्ठल लॉन्स येथे कोव्हीड सेन्टर सुरू करून तेथे 100 कोरोना रुग्णांसाठी 100 बेडस,त्यांच्या साठी दोन वेळेस जेवण, दोन वेळेस चहा व एकवेळ नास्ता, पिण्याच्या पाण्याची सुविधा करून पहिले पाऊल टाकले.
त्यांनंतर डॉ.मारुती भांडकोळी व डॉ.ज्योती भांडकोळी यांनी स्वतःच्या मालकीच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 25 बेडस ची सुविधा मोफत करून दिली आहे.
चेअरमन ऍड.मंगला हांडे , यांच्या महिला पतसंस्थेने शासकीय कोव्हीड हॉस्पिटल साठी टेबल,खुर्च्या,स्टूल,रॅकसह फर्निचर भेट म्हणून दिले आले.
सिताराम पा गायकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सहकारी पतसंस्थानी कोरोना रुग्णांची जीवावर उदार होऊन सेवा करणाऱ्या आशा सेविका व गट प्रवर्तक यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रत्येकी 1000 रुपये,दोन मास्क,1 लिटर सॅनिटायझर अशी चार लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. सीताराम पा गायकर व बाळासाहेब भोर यांच्या पुढाकाराने अगस्ति पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली तर जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केली. या कामी सीताराम पा.गायकर,डॉ.अजित नवले,विनय सावंत,बाळासाहेब भोर,महेश नवले यांनी पुढाकार घेतला.
रोटरी क्लब अकोले यांच्या माध्यमातून शासकीय कोव्हीड हॉस्पिटल साठी फ्रीज,ऑटो हॅन्ड सॅनिटायझर स्टँड,स्टेथॅस्कोप,थर्मल गण,नेब्युलायझर मशीन,बी.पी.एपरेटर्सइत्यादी आरोग्य साहित्य पुरविण्यात आले.
अजून काही सामाजिक संघटना, संस्था यांनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Web Title: To help Corona patients in Akole taluka