Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जिवंत जाळण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जिवंत जाळण्याची धमकी

Threatening to burn a minor girl alive by sexually abusing

अहमदनगर | Ahmednagar Crime: शहरात वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexually abusing ) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पिडीतेसह तिच्या आईला जिवंत जाळण्याची धमकी  दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप अंबादास गर्जे (रा. चिलेखनवाडी ता. नेवासा) असे अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी गर्जे हा पिडीतेच्या आईसोबत काम करत असल्याने तो पिडीतेच्याच घरी राहत होता. काही दिवसांपूर्वी आरोपी गर्जेने पिडीतेला आपण लग्न करू, मी तुला सुखात ठेवील असे सांगितले.

हा प्रकार पिडीतेने तिच्या आईला सांगितला असता त्याला त्यांनी घरातून बाहेर काढले होते. 9 एप्रिलला पिडीतेची आई बाहेर गेली असता आरोपीने पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास पिडीतेसह तिच्या आईला जिवंत जाळण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Threatening to burn a minor girl alive by sexually abusing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here