Home महाराष्ट्र मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली

मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली

Breaking News | Baba Siddique Murder Case: तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या.

third accused in the Baba Siddiqui murder case has been identified

मुंबई : माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकूण तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीचे नाव आता समोर आले आहे. हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता, असे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं. 

त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती.  गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

आता पोलीस या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाले आहेत. या हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या आरोपीचाही शोध घेत आहेत.

दरम्यान, एका सोशल मीडियावरील पोस्टनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानला मदत करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू अशा आशयाची ही पोस्ट आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव पुढे आल्यामुळे आता या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. 

दरम्यान गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे अपयशी, निष्क्रिय गृहमंत्री असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: third accused in the Baba Siddiqui murder case has been identified

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here