Home अहमदनगर प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा आक्रोश; भाव नसल्याने मेथी, कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा आक्रोश; भाव नसल्याने मेथी, कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली

Breaking News | Ahmednagar: मेथीचे भाव कोसळले, मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ.

there was no price, fenugreek and coriander were thrown on the street

अहमदनगर: मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. युवा शेतकरी वैभव शिंदे यांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वैभव शिंदे यांनी अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये चार हजार मेथीच्या जुड्या आणल्या होत्या. या मेथीला केवळ 50 पैसे जुडीप्रमाणे दर मिळाला आहे. यामध्ये त्यांचे गाडी भाडे देखील निघत नसल्याने त्यांनी मेथी रस्त्यावरती फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला. आज देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे मात्र मेथी आणि कोंथिंबीरीला भाव मिळत नसल्याने वैभव शिंदे यांनी रोश व्यक्त केलाय.

साल २०२३ मध्ये हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशात हिवाळ्यांच्या दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. वारंवार होत असलेलं नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे. त्यात आता मेथी आणि कोथिंबीरीचं पिक जास्त आहे. मात्र त्याला कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांनी राग व्यक्त केलाय.

Web Title: there was no price, fenugreek and coriander were thrown on the street

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here