Home अहमदनगर घरात दोन दिवसांनी लग्न आणि चोरट्याने लंपास केले २२ तोळे व रोकड...

घरात दोन दिवसांनी लग्न आणि चोरट्याने लंपास केले २२ तोळे व रोकड लंपास

Theft stole 22 weights and a cash lamp

नेवासा | Theft: तालुक्यातील कुकाणा येथे रात्रीच्या सुमारास घरातील कपाट तोडून बावीस तोळ्याचे सोन्याचे दागिने व ६५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख ८५ हजारांचा मुदेमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

याबाबत शामसुंदर धोंडीराम खेसे रा. कुकाणा ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शामसुंदर यांचा मुलगा ऋषिकेश याचे २० जून रोजी लग्न असल्याने त्यांच्या घरी मुलगी सोनाली व इतर पाहुणे आलेले होते.

शुक्रवारी रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान घरातील सर्व जण कामे आटोपून घराचे दरवाजे लावून झोपी गेले होते. रात्री जाग आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

यामध्ये १ लाख  ६० हजार रुपयांचा चार तोळ्यांचा शाहीहार, ३ लाखांचे साडेसात तोळ्याचे दोन गंठन, २ लाखांच्या पाच तोळ्यांच्या आठ  अंगठ्या , १ लाखांचे अडीच तोळ्यांचे झुंबर, दीड लाखांचा तीन तोळ्याचा राणीहार, ६५ हजाराची रोख रक्कम असा ८ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Theft stole 22 weights and a cash lamp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here