Home संगमनेर संगमनेर तालुक्यात धाडसी चोऱ्या, १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला

संगमनेर तालुक्यात धाडसी चोऱ्या, १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला

Sangamner Theft News:  शनिवारी मध्यरात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्याची घटना,  तब्बल १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला.

theft in Sangamner taluka, goods worth Rs 1 lakh 

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व निमगावजाळी येथे शनिवारी मध्यरात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्याची घटना घडली आहे.  या घटनेत तब्बल १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रांर आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  निमगावजाळी येथिल सचिन पोपट पवार याच्यां राहत्या घरातून शनिवार दि. २७ ते २८ ऑगस्ट दरम्यान २० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे मणी, ७ हजार रुपये किमंतीचे कानातील डुल, ४ हजार रुपये किमंतीची १० भार चांदी व ४ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन चोरानी पोबारा केल्यामुळे एकून ४५ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. यामुळे गुन्हा रंजिस्टर क्रमांक १६१/२०२२ नुसार भादंवी कलम ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक एच. जी. शेख करत आहे.

तर दुसऱ्या घटनेत आश्वी बुद्रुक येथील किर्ती सुर्यभान म्हसे याच्यां राहत्या घरातून शनिवार दि. २७ ते २८ ऑगस्ट दरम्यान ६० हजार रुपये किमंतीची सोन्याची पोत व ९ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकून ६९ हजार ५०० रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यामुळे गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२२ नुसार भादंवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे करत आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: theft in Sangamner taluka, goods worth Rs 1 lakh 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here