ठाकरे गटाचे विभाग प्रमुखाच्या मुलाची निर्घुण हत्या, भर रस्त्यात दगडाने ठेचून संपवलं
Breaking News | Pune Crime: ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून (Murdered) केल्याची धक्कादायक घटना समोर.
पुणे: ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून करण्यात आला आहे. त्याची निघृण हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील देहूरोड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.
विजय थोरी हे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणामुळे थोरी कुटुंब शोकाकुल आहे.
उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांचा 23 वर्षीय मुलगा विशाल थोरी मद्यधुंद अवस्थेत पडला होता. यावेळी आरोपी कपड्याचे दुकान बंद करत होता. त्यानंतर रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी लाकडी बांबू आणि कुंडीने मारहाण करण्यात आली. आरोपी आणि विशालचे पूर्वीपासून वाद असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्य तून झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Web Title: Thackeray group’s department head’s son brutally murdered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study